सांगोला ( प्रतिनिधी)- आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य तथा सूर्योदय परिवाराचे सर्वेसर्वा, एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ११ हजार रुपये देणगी दिली.
महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये हजारो कुटुंबाला आर्थिक आधार देणाऱ्या आणि शेकडो तरुणांच्या हाताला काम देत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणाऱ्या 'सूर्योदय उद्योग समूहाचे' संस्थापक त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात मिळून सुमारे ४३ शाखाअसलेल्या एल. के.पी. मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस सांगोला येथे विविध सामाजिक उपक्रमांनी गुरुवारी साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त अनिलभाऊ इंगवले यांनी आपुलकी प्रतिष्ठानच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याला ११ हजार रुपयांची देणगी दिली. यावेळी अनिलभाऊ यांचा आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर ,हमीदभाई इनामदार, निलकंठ लिंगे, चंद्रशेखर कवडे, सुरेशकाका चौगुले, अरविंद डोंबे, डॉ.अनिल कांबळे आदीसह सूर्योदय परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments