Type Here to Get Search Results !

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगोला एस.टी. डेपो परिसरात सांगोला नगरपरिषदेकडून वृक्षारोपण


सांगोला (प्रतिनिधी) - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दि. ५ जून रोजी सकाळी १० वा. सांगोला नगरपरिषद, सांगोला अंतर्गत शहरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि येत्या पाच वर्षात एक लाख वृक्ष लागवड करून शहर हिरवेगार करण्याचा संकल्प करत, सांगोला येथील एस.टी. डेपो परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 

  सदर वृक्षारोपण कार्यक्रम सांगोला नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. आनंदाभाऊ माने व मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.


याप्रसंगी उपनगराध्यक्ष श्री. नितीन इंगोले, महिला व बालकल्याण सभापती सौ. छायाताई मेटकरी, सदस्य श्री. चैतन्य राऊत, सदस्या सौ. राणीताई माने, सदस्या सौ. आशादेवी यावलकर, सौ. शोभा निवृत्ती फुले, सदस्य श्री. काशिलिंग गावडे,  श्री. गणेश बनकर आणि श्री. विवेक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले. एस.टी. महामंडळातर्फे आगार व्यवस्थापक श्री. विकास पोफळे व सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. सागर कदम यांनीही वृक्षारोपण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. 

 या मोहिमेप्रसंगी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन पाडे, सिटी कोऑर्डिनेटर श्री. अजितकुमार पवार व योगेश गंगाधरे, बिराप्पा हाके यांच्यासह सांगोला नगरपरिषदेचे व एस.टी. डेपोचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'झाडे लावा, झाडे जगवा' असा संदेश देत उपस्थित सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.

Post a Comment

0 Comments