वाडेगाव - माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्था वाडेगाव व श्री बृहद भारत सामाजिक संस्था मुंबई तस़ेच ग्रामस्थ मेडशिंगी यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुक्यात माणगंगा नदीला मिळणाऱ्या उपनद्यांच्या स्वच्छतेचा शुभारंभ सांगोला पंचायत समितीच्या सभापती सौ .पुनमताई इंगवले, तालुका कृषी अधिकारी सौ. दिपाली जाधव, महिला सूतगिरणीच्या चेअरमन श्रीमती कल्पनाताई शिंगाडे, मेडशिंगीचे सरपंच प्रतिनिधी प्रतापसिंह इंगवले, पोलीस पाटील संतोष इंगवले, फॅबटेक उद्योग समूहाचे प्रमुख भाऊसाहेब रुपनर डॉ. मच्छिंद्र सोनलकर, सुदर्शन इंगवले, प्रशांत पाटील, माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे, वाडेगावचे उपसरपंच शिवाजी दिघे, सामाजिक कार्यकर्ते बसवेश्वर झाडबुके, इंजिनियर अमित नष्टे, गणेश इंगवले, संजय पाटील, प्रभाकर कसबे, प्रभाकर कांबळे ,संजय नष्टे, गणेश इंगवले, संजय कसबे, तानाजी आळतेकर इ. मान्यवरांच्या हस्ते मशिनरीचे पूजन करून श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. सांगोला तालुक्यातील ५३ किलोमीटरचे माणनदीपात्र स्वच्छ करून पुनर्जीवित केल्यानंतर नैसर्गिक पाण्याचे स्रोत अधिक बळकट व्हावेत या दृष्टीने वाडेगाव परिसरातील शिंदे ओढ्याची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर अफ्रुका नदीपात्र स्वच्छ करून माण नदीला मिळणारे इतर ओढे स्वच्छ केले तर जलसंवर्धनाचे काम अधिक प्रभावी होईल. असे विचार उपस्थित मान्यवराद्वारे व्यक्त करण्यात आले. संजय मोरे व राजेंद्र सोनलकर यांच्या दोन जेसीबी मशीनद्वारे कामाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी शासनाच्या विविध योजना विषयीची माहिती दिली.

Post a Comment
0 Comments