Type Here to Get Search Results !

सांगोला नगरपरिषदेचा कर भरणा दि. ३१ मार्च २०२६ पूर्वी करावा - मुख्याधिकारी, डॉ सुधीर गवळी


सांगोला - सांगोला नगरपरिषदेचा कर भरणा दि. ३१ मार्च २०२६ पूर्वी करावा असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी केले. नगरपालिकेचा आज दि. २७/३/२०२६ रोजीपर्यंत एकत्रित मालमत्ता कर ३ कोटी ३१ लक्ष रुपये वसूल झालेला आहे. अजून ३ कोटी २२ लक्ष रुपये थकीत रक्कम वसूल होणे बाकी आहे. सांगोला नगर परिषदेची पाणीपुरवठा विभागाकडील २७/०३/२०२६ अखेर पाणीपट्टीची एकूण वसुली १६८.३५ लक्ष इतकी झाली आहे. अजून १ कोटी १६ लक्ष रुपये वसूल होणे बाकी आहे. गाळा भाडे ६२ लक्ष वसुली झालेली आहे. 

सांगोला नगरपरिषदेकडून थकबाकीदार गाळेधारकांचे गाळे सील करणे, मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई करणेत येत आहे.  सांगोला नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी आपली सर्व मालमत्ता कर, गाळा भाडे व पाणीपट्टीची संपूर्ण रक्कम दि. ३१ मार्च पूर्वी वेळेत भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments