वाढेगांव - सोलापूर जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार व सांगोला पंचायत समितीच्या नूतन सभापती सौ. पूनमताई इंगवले यांनी सांडस मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस सदिच्छा भेट दिली. यावेळी सांडसमळा शाळेची सद्यस्थिती व अडीअडचणी त्यानी जाणून घेतल्या. याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य बापूसाहेब जावीर, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदूभाऊ दिघे, कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले साहेब, सांगोला बीटचे विस्तार अधिकारी कुमठेकर साहेब, वाढेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मठपती साहेब, वाढेगाव ग्रामपंचायत सदस्य महादेव दिघे सर, राहुल घोंगडे सर, केंद्रीय मुख्याध्यापक विजय इंगवले गुरुजी, प्रवीण दिघे गुरुजी इ. उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार अनुसे गुरुजी व राहुल घोंगडे यांनी केले. माजी सरपंच डॉ. पवार साहेब यांनी आपल्या प्रस्तावनेत शाळेच्या दोन्ही खोल्या नादुरुस्त व धोकादायक असून त्या पाडून त्या ठिकाणी नवीन दोन खोल्या मंजूर कराव्यात असे सांगितले.
सभापतींनी आपल्या भाषणामध्ये शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून प्रस्ताव लवकरात लवकर जिल्हा परिषदेला पाठवून द्यावा असे सांगितले. माझ्या कामाच्या यादीत पहिले काम आपल्या शाळेचे असेल त्यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चेतनसिंह केदार यांनी दिले. शाळेचा परिसर, वृक्ष संवर्धन व गुणवत्ता याबद्दल कौतुक केले. सदर प्रसंगी माजी उपसरपंच अनिल दिघे, मेजर शहाजी दिघे, मुलाणी सर, डॉ. मनोज पाटील, शिवाजी दिघे, डॉ. सुदर्शन इंगवले, ज्येष्ठ नागरिक सतीशअण्णा दिघे, छगन दिघे सर,पप्पू पाटील, शैला दिघे मॅडम, माजी राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा हसीना मुलाणी, विद्या दिघे, स्वाती चव्हाण, अंगणवाडी ताई चौधरी मॅडम, केंगार मॅडम, सविता भगत, पूजा दिघे, उपशिक्षिका सौ. अनुसे मॅडम, जहांगीर मुलाणी, सुभेदार मुलाणी, पोपट भगत, खुदाबक्ष मुलाणी, मामा चौधरी, सौदागर दिघे, सुरेश पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश दिघे, उपाध्यक्ष अशपाक मुलाणी, माजी अध्यक्ष सुरज मुलाणी, परमेश्वर दिघे, आप्पा लंबे, सिद्धू भोसले, सौदागर दिघे, गणेश फुले, भाऊसाहेब परीट, सिद्धेश्वर भगत,राजाराम माने, कैवल्य चौधरी, प्रदीप भगत, प्रकाश पवार, सिद्धेश्वर रेवे शिवाजी दिघे, विकास ऐवळे, इ. सह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य राहुल घोंगडे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment
0 Comments