Type Here to Get Search Results !

सांगोला नगर परिषदेमार्फत व महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन


सांगोला - 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' व 'माझी वसुंधरा ६.०' अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगोला नगर परिषदेमार्फत विविध स्पर्धा तसेच होममिनिस्टर - खेळ पैठणीचा, यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. महिलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता *पाककला स्पर्धा* तसेच दुपारी २.०० वाजता *ग्रुप डान्स स्पर्धेचे* आयोजन करण्यात आलेले आहे. पाक कला स्पर्धेचा विषय *मूग व हुलगा यापासून बनवलेल्या चविष्ट ,पौष्टिक, रुचकर पदार्थ* तसेच पाक कलेतील स्पर्धेतील प्रत्येकी पहिल्या तीन क्रमांकांना रक्कम रुपये ५००१ ,३००१, २००१ प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह.  ग्रुप डान्स स्पर्धेचा विषय *भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब /सामाजिक संदेश* ग्रुप डान्स स्पर्धेतील प्रत्येकी पहिल्या तीन क्रमांकांना  रक्कम रुपये ७००१,५००१, ३००१  प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह तसेच उत्तेजनार्थ बक्षीसही दिले जाणार आहेत. दि. ९ मार्च २०२६ रोजी 'होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा', लकी ड्रॉ व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन दुपारी १२ वा.  करण्यात आले आहे. वरील सर्व कार्यक्रम *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन ( टाऊन हॉल )* येथे होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत 7972100365, 7709092241 या नंबर वर नाव नोंदणी करावी. तरी सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. छायाताई मेटकरी व लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. आनंदाभाऊ माने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments