सांगोला - सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांनी 'रमण इफेक्ट' (Raman Effect) या शोधाची घोषणा केली होती.ज्यासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. वैज्ञानिक जागरूकता निर्माण करणे आणि दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व सांगणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध उपक्रम घेण्यात आले त्यामध्ये विज्ञान प्रदर्शन,मॅथ्स लॅब व मॅथ्स बाजार भरवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु. कॉलेजचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.भीमाशंकर पैलवान हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके,सी. व्ही.रमण व श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला यानंतर श्री.पैलवान सर यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे व मॅथ्स लॅबचे उद्घाटन संपन्न झाले.
विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे तसेच मॅथ्स लॅबमध्ये विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पनांच्या आधारे केलेल्या शैक्षणिक साधनांचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे,पर्यवेक्षिका कु.सुकेशनी नागटिळक, विज्ञान प्रदर्शनासाठीचे परीक्षक श्री.यतिराज सुरवसे व श्री.उत्तम बेहरे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.पैलवान सर यांनी अनेक शास्त्रज्ञांच्या जीवनातील व त्यांच्या शोधांच्या कथा सांगितल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी का आणि कसे याचा विचार केला पाहिजे शास्त्रज्ञांची तपश्चर्या लक्षात घेतली पाहिजे आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रसंगांमध्ये विज्ञानाचा बोध आपणाला होत असतो तो आपण जाणून घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांची चरित्रे वाचावीत व त्याप्रमाणे आपणही परिश्रम घेऊन आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवावे असे प्रतिपादन त्यांनी केले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कु.सुकेशनी नागटिळक यांनी प्रास्ताविक केले व विज्ञान दिनाबद्दल माहिती सांगितली.
याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान यावे तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक देवाणघेवाण कळावी या दृष्टिकोनातून विद्यालयांमध्ये मॅथ्स बाजार भरवण्यात आलेला होता.यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भाज्या तसेच शैक्षणिक साहित्य विकण्यास आणले होते त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात आयोजित केलेल्या या उपक्रमाबाबत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व पालकांनी कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान व गणित विभागातील कु.सुकेशनी नागटिळक,कु.आरती फुले,सफोरा सय्यद, प्रियांका नामदे,सुप्रिया मेटकरी, सायली घोंगडे,वर्षा माळी, लवटे सर, युवराज केंगार, तानाजी गेजगे, पल्लवी थोरात तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.लता देवळे यांनी केले.


Post a Comment
0 Comments