Type Here to Get Search Results !

सांगोला नगरपरिषदेकडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष निमित्त पालखी सोहळाचे आयोजन


 सांगोला - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे. येत्या " गोकुळ आष्टमी" दि. १५/०८/२०२५ रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांची ७५० वी जयंती आहे. त्यानुषंगाने सांगोला नगरपरिषदेकडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा / मुर्ती पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त शहरातील सर्व सन्मानिय हरिभक्त पारायण महाराज, भजनी मंडळ, सर्व सेवाभावी संस्था, वारकरी संप्रदाय मंडळी ( सांगोला शहर) व सांगोला शहरातील सर्व नागरिक यांचेसह शहरातून दि. १५/०८/२०२५ रोजी टाळ मृदंगाच्या घोषात भजन व हरिनाम जप घेत दिंडी निघणार आहे. सदर दिंडी  नगरपरिषद कार्यालय येथून सायं ४.०० वा. निघणार आहे. तरी सदर दिंडीमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments