सांगोला (प्रतिनिधी) - सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या तीन टक्के वृक्ष लागवड आहे, ही लागवड आमदार सुभाषबापू देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व सोलापूर सोशल फौंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड करून सोलापूर जिल्हा समृद्ध करूया असे विचार सोशल फौंडेशनचे सल्लागार मा. अजितदादा कंड्रे यांनी व्यक्त केले. माणगंगा ब्रह्मणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सांगोला तालुक्यातील माण नदी काठावर वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन अशा खुल्या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेसाठी लागणारी विविध प्रकारची रोपे सोशल फौंडेशन सोलापूर यांच्यावतीने पुरविण्यात आली होती, या रोपाच्या वाटपप्रसंगी अजितदादा कंड्रे बोलत होते. वृक्षारोपण स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांच्या ग्रामपंचायतीनी दि. १४ ऑगस्ट रोजी या रोपाचे वाटप सोशल फौंडेशनचे सल्लागार अजितदादा कंड्रे, सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील, डॉ. श्रीधर यलमार, अॅड. गजानन भाकरे यांच्या हस्ते विविध गावच्या ग्रामस्थांना रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माणगंगा भ्रमण सेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे, उपाध्यक्ष डॉ. विजय जाधव, सचिव डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. मच्छिंद्र सोनलकर तसेच चिणके गावचे उपसरपंच मोहन मिसाळ, तानाजी केदार, सुरेश मिसाळ, तानाजी मिसाळ, राजेश मिसाळ, दत्तात्रय मिसाळ, नंदकुमार मिसाळ, मुख्याध्यापक बंडगर गुरुजी, सुहास राऊत, माजी सरपंच गोपाळ मिसाळ, राजू झरे इ. सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी विजय पाटील व अॅड. गजानन भाकरे यांनी आपले विचार व्यक्त करताना दि. २७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आयोजित केलेल्या पर्यटन सप्ताहाची संपूर्ण सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी माण नदी काठावर आयोजित केलेल्या वृक्ष लागवड स्पर्धेची माहिती दिली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच मोहन मिसाळ यांनी केले. प्रारंभी उपस्थित सर्व पाहुण्यांचे सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. वृक्ष लागवडीसाठी आम. सुभाषबापू देशमुख यांनी उत्कृष्ट प्रकारच्या विविध जातींच्या रोपांचा पुरवठा केल्याबद्दल सर्व उपस्थितांच्या वतीने आम. सुभाषबापू देशमुख यांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment
0 Comments