सांगोला - सांगोला नगरपरिषदेच्या वतीने दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची ७५० वी जयंती निमित्त आयोजित पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला सांगोला परिसरातील नागरीक, वारकरी व भक्तांनी हजेरी लावली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सांगोला शहरात टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात उत्साहपूर्ण मिरवणूक काढली.
पालखीची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यावेळी स्थानिक विठ्ठल भजनी मंडळ (पुरुष) आणि रुद्र महिला भजनी मंडळ यांनी सादर केलेल्या दिंड्यांनी सोहळ्याची शोभा वाढवली. त्यांच्या भक्तिमय भजनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.सोहळ्यादरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित भजन, भक्तीगीते आणि गोल रिंगण यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. "सर्वांच्या सहकार्यामुळे हा उत्सव यशस्वी झाला,” असे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments