Type Here to Get Search Results !

वाढेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा जोरदार शुभारंभ

 


सांगोला - वाढेगांव ता. सांगोला येथे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून सुरुवात करून स्पर्धेच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. सभेच्या सुरुवातीस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त टाळ्याच्या गजरात शुभेच्छा देण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. कोमल डोईफोडे होत्या. सुरुवातीस सांगोला पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा या अभियानाचे वाढेगाव पालक अधिकारी निखिल बाबर यांनी प्रास्ताविक करून अभियाना विषयीची माहिती दिली. त्यानंतर वाढेगावचे ग्राम विस्तार अधिकारी सोमनाथ होळ यांनी स्पर्धात्मक अभियान कशा पद्धतीने राबवायचे याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर उपसरपंच शिवाजी दिघे, वैजिनाथ घोंगडे, वसंत दिघे गुरुजी, माजी सरपंच डॉ. धनंजय पवार यांनी आपल्या मनोगतातून या अभियाना संदर्भात मार्गदर्शन केले. या ग्रामसभेला गावातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवून राज्य पातळीवरील पारितोषिक मिळवण्याचा गावकऱ्यांनी निर्धार केला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला बचत गटातील सर्व अध्यक्ष व सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे या अभियानासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्येच स्वयंस्फूर्तीने रोख रक्कम देणगी स्वरुपात जमा केली व अभियानामध्ये आपला उत्फुर्त सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments