मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती
सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला येथील श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दिपक बंदरे यांना महाराष्ट्र बिझनेस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. रिसेल इन यांच्या सौजन्याने दिला जाणारा हा पुरस्कार शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी नाशिक येथे संपन्न झाला. अभिनेत्री प्राजक्ता माळी, डेप्युटी कमिशनर जी.एस.टी. समाधान महाजन, सकाळ मीडिया ग्रुप नाशिकचे विक्रांत मते, हेमंत राठी चेअरमन राम बंधू मसाले यांच्या उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात २५ शाखेद्वारे श्री विठ्ठल मल्टीस्टेट ही संस्था उत्कृष्ट आर्थिक सेवा बजावत आहे. या सेवेचा गौरव म्हणून चेअरमन दिपक बंदरे याना या अवार्डने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments