सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने मेडशिंगी ता. सांगोला येथील दे.भ. कै. संभाजीराव शेंडे विद्यालयात ४ ते ६ कि.मी. अंतर चालत येणाऱ्या ६ विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात आल्या.
दे.भ. कै. संभाजीराव शेंडे विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ६ गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव म्हणाले की, आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी मोठ्या प्रमाणात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच जुन्या परंतु सुस्थितीत असलेल्या सायकल जमा करून त्या दुरुस्त करून वाटप करण्यात येत आहेत. कुटुंबातील अडीअडचणीमुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आपुलकीच्या माध्यमातून प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थाध्यक्ष अरुणभाऊ शेंडे यांनी सांगोला तालुक्यात आपुलकी प्रतिष्ठानचे चालू असलेले काम कौतुकास्पद असल्याचे सांगून शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल तसेच शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल आपुलकीचे आभार मानले. यावेळी शाळेच्या प्रांगणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्राचार्या पारेकर मॅडम, आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य तथा सूर्योदय परिवाराचे प्रमुख, एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिल इंगवले, डॉ. बंडोपंत लवटे, डॉ. मच्छिन्द्र सोनलकर, चंद्रशेखर कवडे, अमर कुलकर्णी, सुनील मारडे, उपसरपंच सोनलकर ताई यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय मुंढे यांनी केले.

Post a Comment
0 Comments