सांगोला ( प्रतिनिधी )- निजामपूर ता. सांगोला येथील एका गरजू महिलेला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून आपुलकी प्रतिष्ठान कडून शेळीची पाट देण्यात आली.
निजामपूर- वाटंबरे रस्त्यालगत राहणाऱ्या एका महिलेचा पती आजारी असताना मोठा खर्च केल्यानंतरही उपचारादरम्यान मृत्यू पावल्याने सध्या ही महिला आपल्या १८ वर्षांच्या मुलाबरोबर राहते. दोघेही रोजंदारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात.या कुटुंबाला छोटीशी मदत म्हणून आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने शेळीची पाट सोमवारी देण्यात आली. त्याचबरोबर शेजारीच असलेल्या त्यांच्या पुतणीला शालेय साहित्य देण्यात आले.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सुरेशकाका चौगुले, डॉ. अनिल कांबळे, चंद्रशेखर कवडे, अरविंद डोंबे, महादेव दिवटे आदीसह निजामपूरचे पोलीस पाटील बिरा माने, संदीप कोळेकर आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments