Type Here to Get Search Results !

उद्योजक तात्यासाहेब (भाऊ) केदार यांच्या वाढदिवसानिमित्त चेतनसिंह केदार- सावंत यांचेकडून आपुलकी प्रतिष्ठानला ११हजार १११ रुपयांची देणगी


सांगोला (प्रतिनिधी )- सांगोला येथील उद्योजक तात्यासाहेब (भाऊ) केदार - सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सुपुत्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत यांनी आपुलकी प्रतिष्ठानला ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली.

    सांगोला येथील उद्योजक तात्यासाहेब (भाऊ) केदार- सावंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार -सावंत यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यात सांगोला तालुक्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठान या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला ११ हजार १११ रुपये देणगी दिली.

     आपुलकी प्रतिष्ठानला देणगी दिल्याबद्दल यावेळी चेतनसिंह केदार- सावंत यांचा आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सुरेशकाका चौगुले, शशिकांत येलपले, रमेशअण्णा देशपांडे, पांडुरंग केदार- सावंत, अरविंद डोंबे, अजयकुमार बाबर, वसंत माने, महादेव दिवटे, सोमनाथ सपाटे, श्रीकांत हसबनीस, सुभाष पाटोळे, बाळासाहेब देशमुख, अनिल केदार-सावंत, संजय केदार-सावंत, शंकर केदार-सावंत, बाळासाहेब आसबे, भालचंद्र भंडारे, सिद्धेश्वर चौगुले, प्रवीण जानकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments