सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य, सूर्योदय परिवाराचे सर्वेसर्वा, एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ११, ०००/- ( अकरा हजार) रुपयांची देणगी दिली.
इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर व इतर सदस्यांच्या उपस्थितीत आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यासाठी ११, ०००/- रुपयांची देणगी दिली.
यावेळी बोलताना अनिलभाऊ इंगवले म्हणाले की, मी आपुलकी प्रतिष्ठानचा सदस्य असून आपुलकी प्रतिष्ठानचे गोरगरिब, व तळागाळातील गरजू लोकांसाठी चाललेले काम अत्यंत कौतुकास्पद असून सूर्योदय परिवार आपुलकीच्या या कार्यासाठी सदैव सोबत असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
वाढदिवसानिमित्त देणगी देऊन आपुलकीच्या सामाजिक कार्याला सहकार्य केल्याबद्दल अनिलभाऊ इंगवले यांचा आपुलकीच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी आपुलकीचे सदस्य, सूर्योदय परिवारातील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments