Type Here to Get Search Results !

वाढेगांव येथे स्व. मा. आम. डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप


वाढेगांव - वाढेगांव ता. सांगोला येथील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. मा. आम. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. वाढेगांवातील परमपूज्य उदयसिंहजी देशमुख प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढेगांव तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवाडी, आडसूळ मळा, हजारेवाडी नंबर १ व २, सांडसमळा, दिघे-बामणे, कदम वस्ती अशा एकूण नऊ शाळा आणि एक हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी संजय डोईफोडे, इरफान मुलाणी, विक्रम लवटे, नितीन दिघे, भारत हजारे, संतोष चौगुले, सुभाष घोंगडे, बबलू घोंगडे, सुरेश दिघे, हरिदास हजारे, दत्तात्रय शिनगारे, सोमा वसमाळे इत्यादी सह सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व गावातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments