Type Here to Get Search Results !

गरजू विद्यार्थ्यास रोटरी क्लब सांगोलाच्या वतीने लॅपटॉप प्रदान


सांगोला : सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने आज दिनांक ३० जून २०२६ रोजी दुपारी १ वाजता महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था येथील मीटिंग हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात एका गरजू विद्यार्थ्यास लॅपटॉप प्रदान करण्यात आला.

आजच्या डिजिटल युगात शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. आर्थिक अडचणीमुळे शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ नयेत तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, अभ्यास, संशोधन आणि कौशल्य विकासासाठी मदत व्हावी या हेतूने रोटरी क्लबने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला.

कार्यक्रमादरम्यान डॉ .प्रभाकर माळी व अध्यक्ष रो.श्रीपती आदलिंगे यांनी  विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणात सातत्य, मेहनत आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला. लाभार्थी विद्यार्थ्याने तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी रोटरी क्लबचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब सांगोल्याचे  रो विजय म्हेत्रे, रो धनाजी शिर्के, रो गोविंद माळी, रो सुरेश माळी, रो इंजि अशोक गोडसे, रो इंजि हमीद शेख, रो इंजि मधुकर कांबळे, रो इंजि शरणाप्पा हळळीसागर, रो दीपक चोथे, रो महेश गवळी, रो अमेय मस्के, इंजि राम जाधव आणि उपस्थित नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपक्रमास सहकार्य केले.  अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments