Type Here to Get Search Results !

वाढेगांव येथे काल्याचे कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता


वाढेगांव - वाढेगांव ता. सांगोला येथे गुढीपाडव्याच्या दिवशी सुरु झालेल्या ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता सोहळा काल्याचे किर्तन व महाप्रसादाने बुधवार दि. २५ रोजी संपन्न झाला.  सलग सात दिवस सुरु असलेल्या या पारायण सोहळ्यात दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ तसेच सायं. ७ वा. कीर्तन व त्यानंतर गावभोजन असे दैनंदिन धार्मिक कार्यक्रम होते. मंगळवारी सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. 


बुधवार दि. २५ रोजी ह. भ. प. केरूबुवा लेंडवे महाराज यांचे सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन  व महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता झाली. सलग सात दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमामुळे गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. गेली वीस वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरु आहे. या पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व व मार्गदर्शन ह. भ. प. शिवाजी महाराज साळुंखे व ह. भ. प. डॉ. विजयकुमार जाधव (सर) यांनी भूषविले.

Post a Comment

0 Comments