Type Here to Get Search Results !

वाढेगांव येथील वैभवी नवनाथ जाधव हिची बँक ऑफ इंडिया मध्ये निवड


 सांगोला - वाढेगाव ता. सांगोला येथील कु. वैभवी नवनाथ जाधव हिने इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन मार्फत घेण्यात आलेल्या प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अंतिम निवड मिळवली आहे.

  कु. वैभवी हिने फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, फलटण येथून बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर) पदवी पूर्ण केली असून ती जून २०२३ मध्ये पदवीधर झाली. पदवी शिक्षणानंतर तिने घरूनच ऑनलाईन कोचिंगच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. यानंतर आयबीपीएस मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध बँकिंग परीक्षा देण्यास सुरुवात केली. याच कालावधीत आयडीबीआय बँक मार्फत घेण्यात आलेल्या ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर परीक्षेत तिने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. मात्र, त्यापेक्षा उच्च पदावर कार्य करण्याची इच्छा असल्याने ते पद स्वीकारले नाही आणि अभ्यास सुरूच ठेवला. दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या आयबीपीएस पीओ पूर्व परीक्षेत ती यशस्वी झाली. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या मुख्य परीक्षेतही तिने उत्तम कामगिरी करत यश संपादन केले. पुढे २३ डिसेंबर रोजी सिंबायोसिस इंटरनॅशनल स्कूल, विमाननगर, पुणे येथे तिची मुलाखत पार पडली. अखेर १५ जानेवारी रोजी तिची बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अंतिम निवड जाहीर झाली. 

  तिच्या या यशामध्ये तिचे आई-वडीलांचे महत्त्वपूर्ण योगदान असून तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments