सांगोला - श्री. विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगोला येथे कार्यरत असणाऱ्या सरस्वती पंडित मॅडम यांनी सहकार क्षेत्रात आवश्यक असणारी डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट ही पदवी विशेष प्राविण्यसह प्राप्त केली आहे. सदर परीक्षेसाठी देशभरातून को-ऑपरेटिव्ह सेक्टर मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात श्री. विठ्ठल मल्टीस्टेट कडून सोलापूर जिल्ह्यातून एकमेव व्यक्ती उत्तीर्ण झाली आहे.
सदरची परीक्षा केंद्रीय सहकार विभाग यांचेवतीने वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे येथे घेण्यात आली होती. या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण एक वर्षाचा होता. सदर परीक्षा लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा तीन विभागात विभागली गेली होती. श्री. विठ्ठल मल्टीस्टेट नेहमीच विविध प्रकारच्या आकर्षक योजना, सर्वोत्कृष्ट बँकिंग याद्वारे प्रसिद्ध आहेच. पण कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करून संस्थेची गुणवत्ता वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्नशील असते. त्यांच्या या यशाबद्दल श्री. विठ्ठल मल्टीस्टेट चे सर्व कर्मचारी व चेअरमन यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांना कर्तव्यदक्ष संस्थापक व चेअरमन दीपक बंदरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments