सांगोला ( प्रतिनिधी )- पुणे येथे सिनियर आर्किटेक्ट पदावर कार्यरत असलेल्या कु. सायली राजेंद्र यादव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ५०००/- रुपये देणगी देऊन आपुलकी जोपासली आहे.
आपुलकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र यादव यांची कन्या सायली यादव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ५०००/- रुपये देणगी दिली.
आपुलकी प्रतिष्ठान कार्यालयात देणगी सुपूर्द करताना सायली यादव यांनी आपुलकीच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत होत असल्यामुळे त्यांचे प्रश्न काही अंशी का होईना सुटण्यास सहकार्य होत असल्यामुळे आपुलकीचे आपुलकीने सुरु असलेल्या कार्याला लोक मदत करत असल्याचे सांगितले.
प्रतिष्ठानला देणगी दिल्याबद्दल कु. सायली यादव यांचा वाढदिवसानिमित्त उपस्थित आपुलकी सदस्यांनी सत्कार करून शुभेच्छा देऊन आभार मानले.या कार्यक्रमाला अध्यक्ष राजेंद्र यादव, सुरेशकाका चौगुले अरविंद डोंबे, अरविंद केदार, नारायण विसापूरे सर, बाळासाहेब वाघमारे सर, पैलवान सर, बाळासाहेब नकाते, सोमनाथ सपाटे सर, वसंत माने सर, रमेश गोडसे, दत्तात्रय नवले, कैलास कांबळे, सुनिल मारडे, अमर कुलकर्णी, शिवदास राऊत, बाळकृष्ण चांडोले, राजू कोळेकर, सागर ननावरे, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments