Type Here to Get Search Results !

सांगोला नगरपरिषदेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन


सांगोला (प्रतिनिधी)- आज दि.०५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगोला नगरपरिषदेमार्फत तालुका क्रिडा संकुल येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांगोला विधानसभा सदस्य मा. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी  यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळेस मा. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी वृक्षारोपण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व लावण्यात आलेल्या रोपांची जबाबदारीने जोपासना करावी सुचित केले.तसेच या वृक्षारोपण कार्यक्रमास फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी सांगोला नगरपरिषदेचे अधिकारी श्री.सचिन पाडे, श्री. रोहीत गाडे , श्री.विनोद सर्वगोड , श्रीम. प्रियांका पाटील, श्रीम. अस्मिता निकम ,श्री महेश रजपूत, श्री.करण सरोदे, श्री.प्रभाकर कांबळे, श्री. योगेश गंगाधरे व इतर कर्मचारी वर्ग यांनाही वृक्षारोपण केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.आरिफ मुलाणी व  कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments