डॉ. महादेव गायकवाड, विजय चव्हाण, साधना कुलकर्णी, जानकाबाई चंदनशिवे व माणगंगा भ्रमणसेवा यंदाचे मानकरी
सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. चार व्यक्ती व एका संस्थेस हे पुरस्कार १ जानेवारी २०२५ रोजी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र यादव व सचिव संतोष महिमकर यांनी दिली.
आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना व एका संस्थेस पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारासाठी खालील व्यक्ती व संस्थेची निवड करण्यात आली आहे.
डॉ. महादेव संभाजी गायकवाड ( लोणविरे ) यांना सृजनशील शेतकरी पुरस्कार, विजय रामचंद्र चव्हाण सांगलीकर (सांगोला ) यांना समाजसेवा प्रेरणा पुरस्कार, श्रीमती साधना श्रीगणेश कुलकर्णी (सांगोला ) यांना कृतिशील आदर्श माता पुरस्कार, श्रीमती जानकाबाई दिगंबर चंदनशिवे ( अजनाळे ) यांना सार्थ स्वाभिमान पुरस्कार, तर वाढेगाव येथील माणगंगा भ्रमणसेवा बहूउद्देशीय संस्था यांना आदर्श संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा १ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे होणार असल्याचे सचिव संतोष महिमकर यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments