सांगोला ( प्रतिनिधी)- रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेला जीवदान दिल्याबद्दल डॉ. धनंजय गावडे यांचा आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सुजाता जीवन गौड ही महिला १ डिसेंबर रोजी सांगोला रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली होती. सदर महिलेला डॉ. गावडे यांच्या सद्गुरू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट केले होते. या महिलेच्या पायाला झालेल्या जखमा खूप मोठ्या होत्या. उपचारासाठी मोठा खर्च होता. परंतु डॉ. धनंजय गावडे यांनी या महिलेवर योग्य उपचार करून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले तसेच आपुलकी जपत तिची परिस्थिती पाहून बिलामध्ये सवलतही दिली. आपुलकीकडे मदतीसाठी गौड कुटुंबीय आले तेव्हा सदस्यांनी या महिलेची भेट घेऊन धीर देण्याचे काम करत थोडी मदतही केली. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून या महिलेला जीवदान दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपुलकी प्रतिष्ठान सदस्यांनी डॉ. गावडे यांना भेटून गुलाब पुष्पाचे रोप व कुंडी देऊन सन्मान करत अभिनंदन केले. यावेळी आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, अच्युत फुले, सुरेशकाका चौगुले आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments