Type Here to Get Search Results !

बिगबॉसफेम धनंजय पोवार यांची चेअरमन दिपक बंदरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

 


वाढेगांव ( प्रतिनिधी) - मराठी बिगबॉसच्या घरातील सदस्य, विनोदी अभिनयाची ओळख असलेले रिलस्टार धनंजय पोवार उर्फ डीपी दादा यांनी नुकतीच श्री. विठ्ठल मल्टिस्टेटचे चेअरमन दिपक बंदरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी चेअरमन दिपक बंदरे यांच्या हस्ते शाल, हार व विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. बिगबॉसच्या घरातील उत्कृष्ठ अभिनय व  त्यांच्या विनोदी कलेमुळे सर्वानाच परिचित असल्याने चाहत्यांची त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती. परिक्रमा माणगंगेची या पुस्तकाची प्रत त्यांना भेट देण्यात आली. 


यावेळी ग्रा. पं. सदस्य संगमेश्वर घोंगडे, महेश तेली, गणेश बंदरे, महेश घोंगडे, प्रविण भगत, श्रीकृष्ण माने, आकाश उबाळे, अमोल भोसले, शुभम जाधव, नितीन दिघे, सौरभ भगत, निखिल घोंगडे, प्रा. प्रशांत बुरांडे, प्रा. राहुल इंगोले, अमीर बागवान इ. सह श्री. विठ्ठल मल्टिस्टेट बँकेचा स्टाफ उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments