सांगोला (प्रतिनिधी)- वाणीचिंचाळे ता. सांगोला येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सिताराम गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चेअरमन पदाची निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोसावी व भारत कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले होते. यावेळी सिताराम गायकवाड यांचा चेअरमनपदासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी मोहन झाडबुके, मंगल जाधव, बबन केंगार, महादेव घुणे,कलावती निळे, बसवंत पाटील उपस्थित होते. निवड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा लक्ष्मण निळे, जितेंद्र गडहिरे , रघुनाथ गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच मावळते चेअरमन ज्ञानेश्वर निळे व व्हा. चेअरमन भागवत लंबे यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.
यावेळी संतोष हेगडे, बाळासाहेब केंगार, दत्तात्रय गंगाधरे,दगडु जाधव, सचिन गायकवाड यांच्यासह गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments