सलग दुसर्या दिवशीही आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा आवाज घुमला
सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नुतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मागील दोन दिवसापासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा सांगोला मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम नवनियुक्त आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे कडून सुरू आहे.सांगोला मतदार संघातील विविध विकासकामांची मुद्देसुर मांडणी करीत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचेकडून विविध विकास कामांची मागणी केली जात आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशीही आपल्या मतदार संघांपैकी अनेक प्रलंबित आणि महत्वाच्या प्रश्नावर आवाज उठविला आहे. यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील थकीत चारा छावणीची बिले ताबडतोब द्यावीत, माणदेश पट्टामधील तेल्या रोगामुळे नुकसान झालेल्या डाळींब बागासाठी पुन्हा लागवड करण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, शेतकरी-पशुपालक दुध धंद्याकडे वळालेले आहे,गाईच्या दुधाला प्रतिलीटर 40/-रुपये दर द्यावा, दुध दराबाबत ज्या जाचक अटी शिथील कराव्यात व सुतगिरण्याच्या जाचक अटी शिथील कराव्यात, अशी मागणी विधीमंडळामध्ये केली.
सलग दुसर्या दिवशी प्रश्न मांडण्याची संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करताना आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी प्रचारादरम्यान मतदारांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण मांडणी ते विधिमंडळात करत आहेत. पहिल्यांदाच निवडुन आलेल्या आमदाराकडून असे सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे व जनतेशी निगडित असणारे प्रश्न मांडले जात असल्यामुळे सांगोला मतदारसंघातील जनतेकडून आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे कौतुक होत आहे.
Post a Comment
0 Comments