अशोक कामटे संघटनेचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद:- गजानन बनकर*
सांगोला ( प्रतिनिधी) - सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचा 15 वा वर्धापन दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
सुरुवातीस स्टेशन रोड येथील संघटनेच्या मुख्य कार्यालयात शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक गजानन बनकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पित करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. सागर कांबळे, बाळासाहेब बनकर, रामभाऊ शिंदे, सचिन सपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गजानन बनकर यांनी वर्धापन दिनानिमित्त संघटनेच्या सामाजिक कार्याचे, विविध उपक्रमांचे कौतुक करून संघटनेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांकरिता गरज लक्षात घेता सुधारित रेल्वे वेळापत्रकाचे अनावरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. तसेच दीपावली सणानिमित्त आर्थिक दुर्बल घटकातील वंचित नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले, त्याचबरोबर संघटनेच्या कार्यालयात दिवसभर देशभक्तीपर , दीपावली गीताचा जागर सुरू ठेवून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चारुदत्त खडतरे, विठ्ठलपंत शिंदे सर, अमोल शिंगारे,सुयोग बनसोडे, विशाल काटकर, बाळासाहेब टापरे,गणेश पाटोळे यांचेसह संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलकंठ शिंदे सर व आभार प्रा. प्रसाद खडतरे सर यांनी मानले.
Post a Comment
0 Comments