Type Here to Get Search Results !

जिल्हा नदी संवर्धन समूहाच्या वतीने चेतनसिंह केदार यांचा सत्कार


वाढेगाव - सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सामाजिक कार्याच्या माध्यमातून परिसरातील नद्यांचे संवर्धन करणारे जलदूत व जलप्रेमी यांच्या प्रतिनिधींनी सोलापूर येथे नव्यानेच निवड झालेले जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

सोलापूर जि. प. शिक्षण विभागाचे नुतन सभापती मा.चेतनसिंह केदार यांचा त्यांच्या सोलापूर येथील जि. प. कार्यालयात मानाची टोपी घालून ,शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा नदी संवर्धन प्रतिनिधी वैजिनाथ घोंगडे, अनिल नारायणपेठकर, शिवाजीराव पवार, दत्ता पाटील, हनुमंत कादे, प्रविण तळे, इसाक शेख, श्रीनिवास गंगणे,संजय पोळ, गणेश जाधव, सिध्दांत बाबरे इ. सह नदी संवर्धन समूहचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments