वाढेगांव - वाढेगांव (सांडस वस्ती) ता. सांगोला येथील स्पंदन ग्रुपकडून पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीमेचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच मुसळधार पावसाने सीना नदीला महापूर आला होता. नदीकाठी असणाऱ्या गावांत पाणी शिरल्याने शेतातील पिकांबरोबर घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी अनेक सामाजिक संस्थेचे हात मदतीसाठी सरसावले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून वाढेगांव (सांडस वस्ती) येथील स्पंदन ग्रुपकडून ग्रामपंचायत कामती खुर्द (घोडके वस्ती) ता. मोहोळ येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. येथील जिल्हा परिषद शाळा, देवस्थाने, सार्वजनिक रस्ते, ग्रामपंचायत आरओ-प्लांट तसेच अंगणवाडी या सर्व इमारती पाण्याखाली पूर्णपणे बुडाल्या होत्या. त्यामुळे तेथील खूप नुकसान झालेच याशिवाय पुराच्या पाण्यामुळे या ठिकाणच्या इमारतीमध्ये माती, कचरा, राळ साठलेली होती. या ग्रुपच्या तरुण कार्यकर्त्यांनी स्वयं प्रेरणेने श्रमदानातून सर्व इमारती स्वच्छ व सॅनिटायझ केल्या. स्वच्छता मोहिमेचा हा चांगला उपक्रम स्पंदन ग्रुपच्यावतीने राबवला गेल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वाढेगांव येथील स्पंदन ग्रुपने पुरग्रस्त भागात राबविली स्वच्छता मोहीम
October 07, 2025
0

Post a Comment
0 Comments