वृद्धाश्रमातील आजी -आजोबांच्या उपस्थितीत साजरा झाला आगळावेगळा वाढदिवस
सांगोला (प्रतिनिधी ) - आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य डॉ. मंगेश लवटे (अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र ) यांचे चिरंजीव समर्थ मंगेश लवटे याच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम सांगोला यांना शेळी व २ पिलांची भेट तसेच आज्जी आजोबांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
चिंचोली रोड वरील मातोश्री वृद्धाश्रमात शुक्रवारी सकाळी समर्थ मंगेश लवटे याचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात असलेल्या आजींच्या हस्ते समर्थचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर केक कट करून समर्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राजेंद्र यादव यांनी मातोश्री वृद्धाश्रमात असलेल्या आज्जी - आजोबांचा सांभाळ करणाऱ्या राहुल जाधव व त्यांच्या मातोश्री यांचे कौतुक केले. त्याचबरोबर या वृद्धाश्रमातील वृद्धांचा वेळ चांगला जावा यासाठी शेळीपालन, कुक्कुटपालन यासारखे छोटे उपक्रम सुरू केले असून या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करून सहकार्य करावे असे आवाहन केले. वृद्धाश्रमातील आज्जी आजोबांना लवटे कुटुंबियांकडून शेळी भेट दिली व फळांचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला डॉ. मंगेश लवटे, सौ. विश्रांती मंगेश लवटे, कु. मृण्मयी लवटे, कु. वेदिका लवटे त्याचबरोबर मातोश्री वृद्धाश्रमाचे राहुल जाधव, सौ. सुधाराणी जाधव, आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, आपुलकी सदस्य डॉ. पी. बी. गव्हाणे, इंजि. विजय नागणे, प्रभाकर सरगर, उमेश चांडोले, प्रविण मोहिते, दत्तात्रय खटकाळे, अमर कुलकर्णी, चंद्रशेखर कवडे, प्रसन्न कदम, सांगोला गुरुकुलचे गाडेकर सर, मंजित पाटील आदीसह वृद्धाश्रमातील आजी आजोबा उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments