सांगोला - कडलास ता. सांगोला येथील आपुलकी मित्र मंडळाकडून विद्यार्थांना गणवेश वाटप करण्यात आले. कडलास येथील कडलास हायस्कूल कडलास मधील सन १९८१-८२ च्या इ. दहावीच्या बॅच यांनी एकत्र येऊन आपुलकी मित्रमंडळ स्थापन केली. या मंडळामार्फत कडलास गावातील गरीब, होतकरू, प्रामाणिक विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचा कार्यक्रम करण्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये कै. हनुमंतराव आनंदराव पाटील विद्या विकास मंडळ संचलित कै.रावसाहेब पाटील आदर्श विद्यालय कडलास येथे गरीब , होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम करण्याचे ठरले व त्याप्रमाणे त्यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना गणवेश देऊन सन्मानित करण्यात आले.
आपुलकी प्रतिष्ठान मधील प्राध्यापक केशव लिगाडे सर ,माजी मुख्याध्यापक शहाजी पाटील सर तसेच डॉ.बबन गायकवाड सर ,डॉक्टर विलास इंगळे श्री पोपट जाधव ,श्री आनंदराव गायकवाड, श्री सुभाष गायकवाड ,श्री विलास अनुसे, श्री विश्वनाथ शिंदे ,श्री प्रकाश उर्फ भाऊसाहेब गायकवाड, श्री संभाजी गायकवाड मेजर व श्री जगन्नाथ गायकवाड आणि श्रीमती निशा डबीर मॅडम या सर्वांच्या वतीने प्रशालेतील १२ विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आला. यावेळी प्राध्यापक केशव लिगाडे व प्राध्यापक बबन गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्षा अनुराधाताई पाटील व संचालक राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. मुख्याध्यापिका श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांनी प्रास्ताविक केले. अनुमोदन नेताजी गाडेकर सर व आभार सहशिक्षक श्री शहाजी माने सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .भारत इंगवले सर यांनी केले.

Post a Comment
0 Comments