सांगोला ( प्रतिनिधी )- कु. शितल बाळासाहेब नकाते हिने सलग ७ परीक्षेत यश संपादन करून वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट (डब्ल्यू.आर.डी.) मध्ये सहाय्यक अभियंता वर्ग १- अधिकारी पदी निवड तिची झाल्याबद्दल आपुलकी प्रतिष्ठान कडून सन्मान करण्यात आला.
सांगोला येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सांगोला शाखा अभियंता तथा आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य बाळासाहेब नकाते यांची कन्या कु. शितल हिने विविध परीक्षेतून एकूण ७ सरकारी पोस्टला गवसनी घातल्यानंतर एमपीएससी २०२३ (MES) सहाय्यक अभियंता वर्ग - १ या पदासाठीच्या परीक्षेतही तिने घवघवीत यश संपादन करत क्लास वन पदाचे स्वप्न अखेर पूर्ण केले.
कु. शितल नकाते हिच्या या घवघवीत यशाबद्दल आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित सदस्यांच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. मच्छिन्द्र सोनलकर यांनी आपले विचार व्यक्त करून शितलला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत डॉ. विधिन कांबळे सर यांनी केले तर आभार अरविंद केदार यांनी मानले. कार्यक्रमाला आपुलकीचे सचिव संतोष महिमकर, माळी रावसाहेब, बिरा आलदर यांचेसह कार्यकारणी सदस्य, तसेच इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments