
सांगोला-पंढरपूर रस्ता हा २४ तास रहदारीचा रस्ता आहे. रात्रंदिवस या रस्त्यावर वर्दळ सुरू असते, सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणावर चिलारीची झाडे उगवली आहेत. ती झाडे मोठी झाल्याने वाऱ्याने रस्त्यावर येतात. रहदारीला अडथळा होत असून सध्या आषाढी वारीनिमित्त अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने पंढरपूरला रस्त्याचे बाजूने पायी चालत जात आहेत. दुचाकी चारचाकी वाहने ही मोठ्या संख्येने जातात . पायी चालत जाणारे वारकरी यांना या चिलारीच्या झाडांमुळे त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला-पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूची चिलार काढण्याची मागणी मा .नगरसेवक सतीश सावंत यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments