आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे अनोखे उद्घाटन
आपुलकी प्रतिष्ठान अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. शैक्षणिक साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना सायकल वाटप, गरजू व निराधार महिलाना शेळी वाटप, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन वाटप, पिठ गिरणी वाटप, दिव्यांगाना तीनचाकी सायकल वाटप करुन आपुलकीने समाज जीवनात मानवतेचे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार डॉ.प्रभाकर माळी यानी काढले. या प्रसंगी डॉ.प्रा.विजय जाधव ,ऍड.गजानन भाकरे, प्रा.राजेंद्र ठोंबरे, दिगंबर जगताप सर, सुरेश माळी, अस्तित्व संस्थेचे शहाजी गडहिरे, मंगळवेढा येथील प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष माळी यानी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमात हार, गुच्छ, फुले, बुके, शाल, सत्कार याना फाटा देवून केवळ शालोपयोगी वस्तुचा स्वीकार करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यानी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. या अनोख्या उद्घाटन सोहळ्यास शहरातील मान्यवर, पत्रकार बंधू, समाजसेवक व महिला भगिनी व आपुलकी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments