Type Here to Get Search Results !

उद्योजक शशिकांत येलपले यांची वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ५०४६ रुपये देणगी


सांगोला ( प्रतिनिधी) - य. मंगेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य, उद्योजक शशिकांत येलपले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यासाठी ५०४६ रुपयांची देणगी दिली.

   आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य शशिकांत येलपले यांच्या वाढदिवसानिमित्त य. मंगेवाडी येथे आधार फाउंडेशन व शशिकांत येलपले मित्र मंडळाच्या वतीने १२ मे रोजी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात १०७ जणांनी रक्तदान केले. त्यानंतर सायंकाळी येलपले यांनी आपुलकी प्रतिष्ठानला वाढदिवसानिमित्त देणगी दिली. यावेळी उदनवाडीचे सरपंच अशोक वलेकर, संजय वलेकर सर, भालचंद्र वलेकर सर, शशिकांत लवटे, माजी सरपंच समर्थ वलेकर, माजी सरपंच फारूक मुलाणी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष योगेश पाटील, युवक नेते संजय शिंगाडे, एम. डी. फ्रुटचे महंमद शेख, आदी उपस्थित होते.

      वाढदिवसानिमित्त देणगी देऊन सामाजिक कार्यास हातभार लावल्याबद्दल शशिकांत येलपले यांचा आपुलकीकडून शाल व गुलाब रोपाची कुंडी देऊन अध्यक्ष राजेंद्र यादव, सुरेकाका चौगुले, अरविंद केदार यांनी सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments