Type Here to Get Search Results !

नामसाधना मंडळाचा ४१ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

 


 सांगोला ( प्रतिनिधी) - धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामसाधना मंडळ या संस्थेचा ४१ वा वर्धापन दिन गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

  एकनाथ षष्ठीच्या दिवशी ४१ वर्षापूर्वी स्थापना झालेल्या नामसाधना मंडळाचा वर्धापन दिन महादेव गल्लीतील श्री दत्त मंदिरात गुरुवारी सकाळी साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त सामुदायिक जप झाल्यानंतर सांगोला शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निलिमा कुलकर्णी-खर्डीकर, ॲड. सारंग वांगीकर, ॲड. सचिन पाटकुलकर, गौरी कुलकर्णी, संजय मदने, पवन लाटणे, इंजि. संतोष भोसले यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

        ॲड. गजानन भाकरे व निलिमा कुलकर्णी खर्डीकर यांनी एकनाथ षष्ठी निमित्त आपले विचार व्यक्त केले. ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त निलिमा कुलकर्णी खर्डीकर यांनी नामसाधना मंडळाला ४१०० रुपयाची देणगी अध्यक्ष मनोज ढोले यांच्याकडे सुपूर्द केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भोसले यांनी तर आभार प्रदर्शन अच्युत फुले यांनी केले. या कार्यक्रमाला नाम साधना मंडळाचे पुरुष व महिला साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments