Type Here to Get Search Results !

बाळकृष्ण चांडोले यांची सेवानिवृत्ती निमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ५ हजार रुपयांची देणगी

 


सांगोला ( प्रतिनिधी )- जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सांगोला येथून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले बाळकृष्ण सदाशिव चांडोले यांनी आपल्या सेवानिवृत्ती निमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ५०००/- रुपये देणगी दिली.

   बाळकृष्ण चांडोले यांनी १९८६ साली आपल्या सेवेला सार्वजनिक बांधकाम उपविभाग सांगोला येथून सुरुवात केली.१७ वर्ष सार्वजनिक बांधकाम विभागात सेवा केल्यानंतर ११ वर्ष आरोग्य विभागात सेवा दिली. त्यानंतर ५ वर्ष माळशिरस तालुक्यात बांधकाम विभागात सेवा केल्यानंतर सांगोल्यात फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून त्यांनी सेवा केली. विविध ठिकाणी आपली सेवा बजावत असताना त्यांनी समाजसेवेसाठीही आपला वेळ दिला. 

         सेवानिवृत्तीच्या निमित्त आपुलकी प्रतिष्ठानला त्यांनी देणगी दिल्याबद्दल आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने चांडोले यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सुरेशकाका चौगुले, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, सुनील मारडे, चंद्रशेखर चौगुले, सेवानिवृत्त निवासी नायब तहसीलदार नंदकुमार चांडोले, मंगळवेढा प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून हरिभाऊ चांडोले व चांडोले परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments