सांगोला (प्रतिनिधी) दि. २० - महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ, मुंबई व महिला विभाग यांच्या वतीने श्री देवांग समाज (रजि.) इचलकरंजी व श्री देवांग कोष्टी समाज चौंडेश्वरी मंदिर, कोल्हापूर यांच्या सहकार्याने कोष्टी समाजातील विविध क्षेत्रातील समाजासाठी उल्लेखनीय उत्कृष्ट कार्य करत असले बद्दल सांगोल्याचे ॲड. डॉ. श्री. अनिल विठ्ठलराव कांबळे, संस्थापक अध्यक्ष चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला यांना २०२५ चा मानाचा समजला जाणारा कोष्टी समाजभूषण पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला. याप्रसंगी समाजातील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बहुसंख्य मान्यवर समाजबांधव उपस्थित होते. विविध स्तरातून ॲड. डॉ. श्री. अनिल विठ्ठलराव कांबळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
Post a Comment
0 Comments