Type Here to Get Search Results !

कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन

 


नाझरे (प्रतिनिधी) - श्री गुरुमूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती त्यांच्या आशीर्वादाने कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी सोहळ्याचे शुक्रवार दि. ४ एप्रिल ते ७ एप्रिल अखेर श्री श्री श्री १०८ रुद्र पशुपती कोळेकर महाराज 31 वेळा पिठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार असून, यावेळी महादेव महाराज हिंगणगावकर हेही पायी चालत निघणार आहेत. तरी गुरु सहवासाचा व शिव चिंतनाचा लाभ घेण्यासाठी कोळे मठात दि. ३ एप्रिल रोजी शिवभक्तांनी मुक्कामास हजर राहावे असे आवाहन चेअरमन महादेव चिवटे यांनी केले आहे. 

        सदर दिंडीमध्ये महादेव महाराज हिंगणगाव, सौ. रेखाताई शिंदे सोमेश्वर देवस्थान हातीद, वीरभद्र देवस्थान नाझरे, रुद्र पशुपती भक्त मंडळ जवळा, रुद्र पशुपती भक्त मंडळ केमवाडी इत्यादी दिंड्या सहभागी होणार आहेत. दि. ४ एप्रिल रोजी कोळेमटातून सकाळी ८ वा. प्रयाण होणार असून, दि. ७ एप्रिल रोजी शिंगणापूर मुक्कामास दिंडी जाणार आहे. यावेळी मुक्कामाच्या ठिकाणी महास्वामींचे आशीर्वाचन, शिव कीर्तन, शिवपाठ तसेच शिवभक्त सौ. जयश्री शीलवंत कोळे यांचे कीर्तन होईल. 

     दि. ७ ते ९ एप्रिल रोजी शिंगणापूर येथे परम रहस्य ग्रंथाचे पारायण यावेळी व्यासपीठ चालक सौ. जयश्री शीलवंत राहतील. दि. ८ एप्रिल रोजी शिवभक्त दयानंद नागापल्ली यांचे कीर्तन व दि. ९ एप्रिल रोजी शिवभक्त हनुमंत कोरे महाराज परांडा यांचे प्रसादाचे किर्तन व भाऊसो गोडसे यांचे भारुड होईल तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोळे ग्रामस्थ व वीरशैव समाज कोळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments