सांगोला ( प्रतिनिधी) - आपुलकी सदस्य, उद्योजक श्री. शशिकांत येलपले यांनी त्यांचे चिरंजीव ओम शशिकांत येलपले याच्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यासाठी ५ हजार १८ रुपयांची देणगी दिली.
श्री. शशिकांत येलपले यांनी त्यांचे चिरंजीव ओम शशिकांत येलपले याचा १८ वा वाढदिवस आपुलकीला देणगी देऊन साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपुलकी प्रतिष्ठानला ५ हजार १८ रुपयांची देणगी देऊ केली.
आपुलकी प्रतिष्ठान सांगोला ही संस्था सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी सांगोला तालुक्यातील एक अग्रेसर संस्था असून तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना योग्य वेळी योग्य मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य ही संस्था गेल्या सहा वर्षापासून करत आहे. अनेकजण सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त आपुलकीला देणगी देऊन सामाजिक कार्याच्या या चळवळीत सहभागी होत आहेत. येलपले कुटुंबियांनी दिलेल्या या देणगीबद्दल येलपले कुटुंबियांचे आपुलकीच्या वतीने आभार मानण्यात आले.
Post a Comment
0 Comments