Type Here to Get Search Results !

आटपाडी येथील राजमाने कुटुंबियांकडून आपुलकीला ५ हजार रुपयांची देणगी


सांगोला ( प्रतिनिधी )- आटपाडी येथील श्री. विजय राजमाने (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा क्रमांक १, आटपाडी) व सध्या कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका सौ. मंगल विजय राजमाने (जि. प. प्रा. शाळा क्रमांक १, आटपाडी) यांनी आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यासाठी ५ हजार रुपयांची देणगी दिली आहे.

     आपुलकी प्रतिष्ठान सांगोला ही संस्था सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी एक अग्रेसर संस्था म्हणून नावारूपास येत आहे. तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना योग्य वेळी योग्य मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य ही संस्था गेल्या सहा वर्षापासून करत आहे. ही संस्था नोंदणीकृत संस्था असून या संस्थेला कर सवलत साठी आवश्यक असलेले ८० जी सर्टिफिकेट प्राप्त झालेले आहे. सध्या अनेकजण सामाजिक बांधिलकी जपत आपुलकीला देणगी देऊन सामाजिक कार्याच्या या चळवळीत सहभागी होताना दिसत आहेत. 

         आपुलकी प्रतिष्ठानच्या या समाजसेवेच्या कार्यासाठी आपलीही थोडी मदत व्हावी म्हणून आटपाडी येथील राजमाने कुटुंबीयांनी ५ हजार रुपयांची देणगी रविवारी देऊ केली. या देणगीबद्दल कु. प्रज्ञा विजय राजमाने (नायब तहसीलदार, दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) व राजमाने परिवाराचे आपुलकीच्या वतीने आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments