प्रामाणिकपणे व्यवसाय केल्याने प्रगती होते - डॉ. शिवाजीराव ढोबळे
नाझरे (प्रतिनिधी) - संत कवी श्रीधर स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीधर स्वामी देवस्थान ट्रस्ट तर्फे नाझरे ता. सांगोला येथे अकरा यशस्वी उद्योजकांना पुरस्कार वितरण समारंभ करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ, ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉक्टर शिवाजीराव ढोबळे हे होते.
कोणताही व्यवसाय अगर उद्योग करताना प्रामाणिकपणे केल्यास प्रगती होते तसेच आपण सेवा कशी देतो हेही महत्त्वाचे आहे व त्यामुळे प्रगती होते असे मत रुग्णांचे देवदूत डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले. सुरुवातीस शिक्षक नेते अशोक पाटील यांनी सर्व उद्योजकाचा परिचय करून दिला. तसेच संघर्षातून समृद्धीकडे होणारी वाटचाल कौतुकास्पद उद्योजकांचे असल्याचे आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके यांनी सांगितले. तसेच उद्योजक लक्ष्मण बनसोडे, हनुमंत गोसावी, संजय सुतार, बाळासो रायचूरे, सुखदेव वाघमारे यांनीही सत्कार केल्याने भारावून गेलो व ट्रस्टचे आभार मानले.
यशस्वी उद्योजक संजय रायचुरे, संजय सुतार, लक्ष्मण बनसोडे, फतरुद्दीन शेख, ज्योतिबा दत्तू, अतिश रजपूत, महेश विभुते, बाळासो रायचुरे, हनुमंत गोसावी, सुखदेव वाघमारे, दीपक सरगर इत्यादी ना गौरवण्यात आले. यावेळी जयंत काका देशपांडे, विनायक देशपांडे, जगदीश देशपांडे, निर्मला काकी देशपांडे यांनी परिश्रम घेतले. सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आनंदा बनसोडे, अशोक गोडसे, नितीन काका काळे, नागेश महाराज, राजू खोकले, शिंदे, महिला, भक्तगण उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक नेते सुनील बनसोडे तर आभार रविराज शेटे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments