Type Here to Get Search Results !

दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी माणिक मराठे यांची तर उपाध्यक्षपदी विलास डोंगरे यांची बिनविरोध निवड

 


सांगोला : सांगोला येथील दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी माणिक मराठे यांची तर उपाध्यक्षपदी विलास डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत अध्यक्ष पदासाठी माणिक मराठे यांची तर उपाध्यक्ष पदासाठी विलास डोंगरे यांचा एकमेव अर्ज झाल्याने त्यांचे बिनविरोध निवड झाल्याचे सहाय्यक सहकारी अधिकारी तथा अध्यासी अधिकारी वि.ह. घोडके यांनी जाहीर केले.याप्रसंगी संस्थेचे संचालक कुमार बनसोडे,वसंत बंडगर, संजय गायकवाड,गोविंद भोसले,कमल खबाले,पल्लवी मेणकर-महाजन हे उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने सभासदांना सर्वसाधारण कर्ज नऊ लाख रुपये, शैक्षणिक कर्ज एक लाख रुपये, तातडीचे कर्ज पन्नास हजार रुपये दिले जाते.तसेच सभासदांच्या मुलीच्या लग्नावेळी शारदादेवी साळुंखे-पाटील लक्ष्मीनारायण शुभमंगल योजनेतून तीस हजार रुपयांची मदत केली जाते. यावेळी जिल्हा पतसंस्थेचे संचालक गुलाबराव पाटील,शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी,विकास साळुंखे,तालुका अध्यक्ष मोहन आवताडे,संजय काळे,दत्ता काशीद, विश्वंभर लवटे,मोहन केदार,तालुका पतसंस्थेचे संचालक संजय काशीद, विजयकुमार इंगवले,मनोहर काशीद, राजेंद्र पाटील,तानाजी खबाले,संतोष निंबाळकर,अंकुश वाघमोडे,उमेश महाजन,संस्था सचिव अमर कुलकर्णी आदी उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.तर संस्थेचे नवीन अध्यक्ष माणिक मराठे व उपाध्यक्ष विलास डोंगरे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांना विश्वासात घेऊन सभासद हितासाठी काम करत राहू असे सांगितले.मोहन आवताडे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

Post a Comment

0 Comments