वाढेगांव (प्रतिनिधी) - वाढेगांव ता. सांगोला येथे श्रीदत्त जयंती उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील श्रीगणेश, श्रीदत्त व साई मंदिरात श्रीदत्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दैनंदिन पूजा, भजन त्यानंतर ह. भ.प. लऊळकर सर यांचे प्रवचन झाले. दुपारी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या’ जयघोषात पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Post a Comment
0 Comments