Type Here to Get Search Results !

करांडेवाडी (बुद्धेहाळ) येथील शेकाप कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

 


सांगोला (प्रतिनिधी) -जिल्ह्याचे नेते दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला तालुक्यातील करांडेवाडी (बुद्धेहाळ) येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. तसेच विधानसभा निवडणुकीत गावातून प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर तालुक्यातील शेकापचे शेकडो कार्यकर्ते दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्सुक असल्याने दररोज शेकापचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याने शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे. सांगोला तालुक्यातील करांडेवाडी (बुद्धेहाळ) येथील माजी सरपंच बाबासाहेब रामचंद्र करांडे, विजय विठ्ठल करांडे, रमेश सुखदेव करांडे, अर्जुन रामचंद्र करांडे, नितीन अर्जुन करांडे, मारुती रामचंद्र करांडे, विष्णू रामचंद्र करांडे, वासुदेव बाबासाहेब करांडे, भीमराव आबा करांडे, बजरंग आबा करांडे, पोपट बजरंग करांडे, विजय दामू करांडे, कृष्णदेव बजरंग करांडे, शिवाजी गंगाराम करांडे, महादेव वसंत करांडे, गंगाराम ज्ञानू करांडे, दादासो गंगाराम करांडे, महेश मारुती करांडे, जितेंद्र यशवंत करांडे, गुरुदेव बाबासाहेब करांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. दिपकआबांनी या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत. यापुढील काळातही ते विकासकामांना प्राधान्य देतील, त्यासाठी आम्ही त्यांना विधानसभा निवडणूकीत विजयी करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments